अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- आज देश कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देतो आहे. यातच या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यात पडला आहे. तसेच देशातील परिस्थिती देखील भयाण झाली आहे.
यावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीत.
लसीकरणासाठी केंद्राकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. अशा शब्दात महसूलमंत्री थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट घातक आहे, आणि आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु आहे. मात्र, केंद्राचे कुठलेही नियोजन नाही आणि कोणतेही धोरण दिसत नाही.
तसेच लसीकरणासाठी असणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ होत आहे. अॅपचे नियोजन राज्याने केले पाहिजे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊनबाबत थोरातांनी दिली डेडलाईन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितही राज्य कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करत आहे. 15 मे नंतर काय करायचे याचा आढावा कॅबिनेटमध्ये घेतला जाईल, असे थोरात यांनी सांगितले.