देवरेंच्या बदलीसाठी महसूल कर्मचारी एकटावले; आंदोलनच सुरूच ठेवणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामुळे नगर जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यातच आता तहसीलदार देवरेंच्या विरोधात तालुक्यातील महसूल कर्मचारी एकटावले आहे. त्यांनी आंदोलन पुकारले आहे.

पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कामकाज ठप्प झाले. एकतर देवरे यांची बदली करा किंवा आमची तालुक्याबाहेर बदली करा, अशी या आंदोलकांची मागणी असून मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोेलन सुरूच राहणार असल्याचे महसूल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे व तलाठी संघटनेचेे अध्यक्ष एस. यू. मांडगे यांनी सांगितले. निवेदनात म्हटले आहे की,

लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत, कोविड सेंटर कॅम्पमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतः केलेला खर्च तहसीलदार देवरे यांनी अदा केलेेला नाही. तहसीलदार देवरे यांचे महिलांविषयी व सर्व कर्मचारी वर्गाविषयीचे दडपशाहीचे धोरण, चुकीचे आहे.

उपोषणकर्ते अरुण आंधळे यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती दिली या कारणास्तव महसूल सहाय्यक दिगंबर पवार यांच्याकडील जमीन संकलनाचा कार्यभार आकस बुद्धीने काढून घेण्यात आला.

बदली झालेले महसूल सहाय्यक प्रल्हाद सलगरे यांच्याकडील संकलनाच्या संचिका पाहण्यासाठी व स्वाक्षरीसाठी शासकीय निवासस्थानी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्या अद्याप परत करण्यात आलेल्या नाहीत. तहसीलदार देवरे यांचे दडपशाहीचे धोरण, चुकीचे आहे. सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24