घरपोच दारू विक्रीचा निर्णय मागे घ्या’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसताना, घेण्यात आलेला घरपोच दारु विक्रीचा निर्णय अत्यंत चुकीचा व घातक असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

एकीकडे कोरोनाने अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत असताना, दुसरीकडे सरकार व्यसनाने सुखी संसाराची राखरांगोळी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

हा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नागरिकांच्या जीवनासाठी आवश्यक असणार्‍या वैद्यकिय सुविधा पुरवण्यास सरकार असमर्थ ठरत असताना दारु विक्री करुन काय सिध्द होणार? हा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24