माळीवाडा बस स्थानक समोर रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शहरातील माळीवाडा बस स्थानक जिल्हा परिषद गेट येथे अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व संघटनेचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर, प्रमुख सल्लागार विलास कराळे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, नरेंद्र अंकुश, सुदाम देशमुख, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कामगार नेते भाऊसाहेब भाकरे, गणेश आटोळे, सागर बिडकर, निलेश कांबळे, संतोष भिंगारदिवे,

शंकर गोरे, गणेश ढाणे, लतीफ शेख, पोपट कराळे, धमक गायकवाड, आतीब खान, राहुल अनभुले, पोपट कांडेकर, गणेश नवले, नासीर खान, जमीर शहा, जुबेर शेख, मतीन शेख, हर्षद सय्यद, नितीन जाधव, मुन्ना परदेशी आदि उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रिक्षा चालकांनी उन्हाळ्यात माणुसकीच्या भावनेने वाटसरुंच्या सोयीसाठी सुरु केलेली पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

रिक्षा चालक बांधव प्रमाणिकपने आपला व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. रिक्षाचालकांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी व कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे. रिक्षा चालकांचा घरकुलचा प्रश्‍न महापालिकेत ठराव घेऊन रिक्षा चालकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अविनाश घुले यांनी माळीवाडा बस स्थानक येथे संपुर्ण जिल्ह्यासह जिल्हा बाहेरुन देखील प्रवासी येत असतात. उन्हाळ्यात तहान भागविण्याचे काम रिक्षा चालकांची पाणपोई करणार आहे. रिक्षा चालक सामाजिक भावनेने घेत असलेले उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24