ताज्या बातम्या

Bike Care Tips : बऱ्याच दिवसांतून बाईक चालवताय? ध्यानात ठेवा काही गोष्टी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Bike Care Tips : अनेकजण कितीतरी दिवस बाईक चालू करत नाही. त्यामुळे त्यामध्ये काही समस्या निर्माण होऊन ती लवकर सुरू होत नाही. जर तुम्हीही या समस्येतून जात असाल ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

कारण जर तुम्ही बऱ्याच दिवसांतून बाईक चालवत असाल तर काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही घरच्या काही अवघ्या काही मिनिटात बाईक चालू करू शकता.

1. तपासावे पेट्रोल 

बऱ्याचदा बाईक चालवताना आपण सेल्फी किंवा किक स्टार्ट करतो. परंतु खूप दिवसांनी बाईक चालवताना आधी पेट्रोल तपासा. बाइक खूप दिवस बंद असल्याने आपण पेट्रोल टाकत नाही.

2. चोकचा वापर करा 

तसेच बाईकवर धूळ आणि घाण साचते. या घाणीचा इंजिन आणि त्याच्या सभोवतालचा जाड थर तयार होतो आणि घाणेरडे स्पार्क प्लग सारख्या काही कारणांमुळे बाईक होत नाही. थंडीच्या वातावरणातही पेट्रोल सहजासहजी इंजिनपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे बाईक सहज सुरू होत नाही तेव्हा चोकचा वापर करा. त्यामुळे बाइक लवकर सुरू होते.

3. टायर फिरवा 

तरीही बाईक सुरू करताना त्रास होत असेल तर बाईक मुख्य स्टँडवर ठेवू शकता. बाईक दुसऱ्या किंवा तिसऱ्या गिअरमध्ये ठेवून बाईकचा मागील टायर फिरवण्याचा प्रयत्न करा. थोडे प्रयत्न करून तुम्ही ती बाईक सुरू करू शकता.

4. मेकॅनिकला बोलवा 

खूप प्रयत्न केले तरी बाईक सुरू होत नसेल तर एखाद्या चांगल्या मेकॅनिकला बोलावून बाईक दाखवणे चांगले.

Ahmednagarlive24 Office