एसबीआयसह ‘ह्या’ मोठ्या बँकांवर सायबर अटॅकचा धोका ; रिपोर्टमध्ये ‘हा’ धक्कादायक खुलासा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-सायबर गुन्हेगार भारतीय यूजर्सना महत्वाची वैयक्तिक माहिती उघड करण्यासाठी लुभावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सोमवारी एका नवीन अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की संशयास्पद संदेशाद्वारे वापरकर्त्यांना आयकर परताव्यासाठी अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. ही लिंक यूजर्सला आयकर ई-फाइलिंग वेब पेजसारखीच दिसते.

टारगेट केलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांचा समावेश आहे.

नवी दिल्लीस्थित थिंक टॅंक सायबरपीस फाउंडेशनद्वारा सायबर सिक्युरिटी कंपनी ऑटोबोट इन्फोसेक यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या चौकशीत हे उघड झाले आहे.

रिपोर्टमध्ये काय सांगितले आहे ? :- अहवालात असे म्हटले आहे की संशयित लिंक अमेरिका आणि फ्रान्सशी संबंधित आहेत. असेही म्हटले आहे की ह्या मोहिमेद्वारे यूजर्स कडून वैयक्तिक तसेच बँकिंगची माहिती संकलित केली जात आहे

आणि या प्रकारच्या जाळ्यात अडकल्याने युजर्सना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. एसएमएसद्वारे शेअर केलेल्या लिंकला कोणतेही डोमेन नेम नाही आणि ते भारत सरकारशी लिंक नाही.

अशा प्रकारे घडत आहेत घटना :- अहवालात असे म्हटले आहे की मोहिमेशी संबंधित सर्व आयपी एड्रेस काही थर्ड पार्टी (तृतीय पक्ष) समर्पित क्लाउड होस्टिंग प्रदात्यांचे आहेत. संपूर्ण मोहीम सुरक्षित HTTP ऐवजी सामान्य किंवा प्लॅन HTTP प्रोटोकॉल वापरते.

याचा अर्थ असा की नेटवर्क किंवा इंटरनेटवर कोणीही व्यक्ती ट्राफिक रोखू शकतो आणि पीडित व्यक्तीचा गैरवापर करण्यासाठी साध्या मजकूरात गोपनीय माहिती मिळवू शकतो.

त्वरित पत्ता लावणे कठीण :- तज्ज्ञांच्या मते, जगभरात अजूनही ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोर्सची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत सायबर स्पेसमध्ये आपले शत्रू कोण आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात ही कल्पना अचूक येत नाही. म्हणून आपल्याकडे असे तंत्रज्ञान असणे फार महत्वाचे आहे. मात्र, सरकारने हे रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. परंतु त्याची अचूक माहिती शोधणे अद्याप एक कठीण काम आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24