अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील तिळापूर येथील रस्त्याचे काम 15 दिवसात मार्गी न लागल्यास रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहुरी व श्रीरामपूर येथील महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राहुरी विधानसभा मतदार संघातील 32 गावांपैकी तिळापूर हे शेवटचे गाव आहे.
मुळा-प्रवरा नदीच्या संगमावरती तिळापूर ह्या गावात पुरातन महादेवाचे मंदिर आहे. ह्या देवस्थान ट्रस्टचा तीर्थक्षेत्र विकास मध्ये ‘क’ वर्गात समाविष्ट झालेला असून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
त्या मंदिरा च्या परिसरात पर्यटन विकासतुन भक्त निवास, संरक्षण भिंत, प्रसाधनगृह अशी विविध विकास कामे झाली आहे. परंतु दुर्दैवी बाब आशी की त्या देवस्थानकडे जाण्यासाठी रस्ता नाही.
15 वर्ष झाली त्या रस्त्यासाठी कुठलाही निधी मंजूर झालेला नाही. त्या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेळोवेळी आमदार, खासदार यांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देऊन देखील रस्त्याचे काम मार्गी लागत नाही.
लोक प्रतिनिधी निवडणूकी पुरते येतात आणि परत ह्या परिसरात फिरकत देखिल नाही. काही मीटर मध्ये मंजूर झाल्याचे कित्येक दिवसापासून सांगत आहे. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला खूप मोठया प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे.
शेवटी हताश झालेल्या गावातील तरुणांनी उपोषणाची हाक पुकारली असून पुढील 15 दिवसात लोकाभिमुख नेतृत्वानी ठोस पाऊले उचलली नाहीतर 1 ऑक्टोबर 2021 रोजी संगमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रस्त्यावर उपोषण करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हंटल आहे.
सदर निवेदन श्रीरामपूर तहसीलदार, राहुरी तहसीलदार तसेच श्रीरामपूर – -राहुरी विधानसभा लोकप्रतिनिधी लहूजी कानडे यांना देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दत्ता जाधव, रुपेश हरतल, विजय गवारे, सचिन जाधव, भाऊसाहेब पवार, विशाल यादव, दादाहरी रोठे, विलास गिते, राहुल जाधव, धनंजय पवार, गौरव रोठे, आदिनाथ जाधव आदी उपस्थित होते.