अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, गुहा, गणेगाव या तीन गावाचा रस्त्याचा प्रश्न पटेल-पंडित- ढुस या तीन कुटुंबाच्या वादात अडकल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वहिवाटीचा रस्ता करून द्या अशी मागणी तहसीलदारांकडे केलेली असताना रस्ता काढून देण्यासाठी भूमिअभिलेखचे अधिकारी ऐनवेळी येण्यास नकार दिल्याने तीनही गावातील ग्रामस्थांनी नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध केला.
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील गवळी माळ या ठिकाणाहून गुहा, गणेगाव व देवळाली प्रवरा या गावांना जोडणारा रस्ता पटेल- पंडित- ढुस या कुटुंबियांच्या वादात अडकला असून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वादामुळे रस्त्यावर मुरुम टाकून देण्यास मज्जाव केला जात होता.
वहिवाटीचा रस्ता तिन्ही गावच्या लोकवर्गणीतून दुरुस्त करण्यासाठी प्रशासनास निवेदन दिले होते. प्रशासनाच्यावतीने संबधीत अधिकारी उपस्थित राहून रस्त्यावर तोडगा काढण्याबाबत महसूल व भूमी अभिलेख प्रशासनाच्यावतीने शुक्रवार 11 वाजता एकत्रित येण्याचे ठरले होते.
त्यानुसार तिन्ही गावचे ग्रामस्थ व महसूल प्रशासन एकत्र आले. मात्र भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तिन्ही गावच्या नगर- मनमाड मार्गावर उतरून रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध केला. महामार्गावर दुतर्फा सुमारे १ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने आंदोलन कर्ते व वाहन चालकांत बाचाबाची घटना घडल्या. जे.ई च्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. उशिरा पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, नीरज बोकील फौजफाटा घेऊन रास्ता रोकोच्या ठिकाणी आले.
संतप्त ग्रामस्थांना रास्ता रोको बंद करा अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा पोलिसांनी दिला. परंतू आमचा प्रश्न मार्गी लावा मगच आम्ही रस्त्यावर उठू असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलीस प्रशासणाने नरमाईची भूमिका घेत ग्रामस्थांना उठवत वादग्रस्त रस्त्यावर नेऊन पाहणी केली. सामंजस्याने रस्तावर मुरुम टाकून रस्ता व वहिवाटीसाठी सूरु करण्याचे ठरले.
मूळ नकाशाप्रमाणे करून देण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह रजपूत व भूमिलेखचे अधिकारी बी.एन. राऊत, एस.पी.बारस्कर यांनी आश्वासन दिले.आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी तिन्ही गावाचे ग्रामस्थ व तीन कुटुंबाची मध्यस्ति करून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान पटेल यांच्या बांधावरील झाडे जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोडल्याने पुन्हा पटेलने रस्त्याने काम थांबून वाद घाल्यास सुरुवात केली होती.त्यानंतर तहसीलदार एफ.आर.शेख घटनास्थळी दाखल होते. या आंदोलनात अमोल भनगडे, दत्तात्रय ढुस, के.मा. कोळसे ज्ञानेश्वर वाणी,
अनिल डोळस, किरण कोळसे, शरद वाबळे, केशर कोबरणे, धनंजय कोळसे, संजय कोबरणे, संपत कोबरणे, बबन कोळसे, विकास कोबरणे, मच्छिंद्र कोळसे, तुषार दिवे, गँगाधर चन्द्रे, राजेंद्र कोबरणे आदी सहभागी झाले होते.