file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नगर मनमाड राज्य महामार्गावर धोकादायक खड्डे निर्माण झाले असून राज्य महामार्गावर मृत्यूचा सापळा बनलाय. प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य महामार्गावर तसेच राहुरी तालूका हद्दीत मोठ मोठी खड्डे पडली दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ मोठी खड्डे होत आहेत.

त्या खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

आता याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. सुमारे तीन तास त्यांनी खड्ड्यात उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्या पासून सावधान करत मार्ग दाखवीला.

सदर खड्ड्यामुळे मोठी जिवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासन कोणाचा अपघात होऊन मरणाची वाट पहात आहे का? असा सवाल गणेश पवार यांनी केलाय.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे.