अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील डॉ.अजय औटी यांच्या राहत्या घरी तसेच हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
यात १ लाख ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला मात्र हॉस्पिटलमधील साहित्या देखील तोडफोड करण्यात आली. यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.वाढत्या चोऱ्यामुळे नागरीक त्रासले आहेत.
कोरडगाव येथील पाथर्डी बोधेगाव रस्त्याच्या लगत असलेल्या डॉ.अजय औटी यांच्या हॉस्पिटल व घराचे गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गेट व दरवाजा तोडुन घरामध्ये प्रवेश केला.
त्यांनतर त्यांनी धारदार शस्त्राचा डॉ.औटी यांच्या पत्नी तसेच दोन मुलींना धाक दाखवुन कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. कपाटातील सुमारे दिड लाखाची रोख रक्कम ,सोन्याचे दागीने काढुन घेतले. डॉ अजय औटी हे स्वत: घराच्या छातावर झोपले होते.
त्यामुळे त्यांना झालेला प्रकार उशीरा समजला. त्यांनी गावातील ग्रामस्थांना माहीती दिली. पोलिस निरिक्षक अरविंद जोंधळे यांनी घटानस्तळी भेट दिली. ठसे तज्ञ व स्वानपथक यांना पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञ पोलिस माधुरी लेंगटे यांनी ठसे मिळाल्याची माहिती दिली.
कोरडगाव बाजारपेठेमध्ये सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण असुन पोलिस प्रशासनाकडुन या मागे झालेल्या चोऱ्यांचा तपास न लागल्याने चोरांचे मनोबल वाढलेले दिसुन येत आहे.