चाकूचा धाक दाखवून दरोडा, सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील दौंड वस्ती येथे दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत साडे ०९ तोळे सोने व १ लाख ३५ हजार रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.

निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत घरातच सामानाची उचकापाचक करत १ लाख ३५ हजार रोख व साडेनऊ तोळे सोने असा ऐवज लुटला आहे.

माजी वनाधिकारी श्री.दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड याच्या घरावर हा दरोडा पडला.त्यांना लगेच घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोन वरून कळवली.

यावरून परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता चोरट्यांनी तात्काळ धूम ठोकली.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास दरोड्याची माहिती कळविली असता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, ,डीवायएसपी श्री.संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे,

नाईक संजय दुधाडे दत्तात्रय दिघे ,पो कॉ किरण पवार, किशोर जाधव, सुनील दिघे ,पंकज गोसावी ,राहुल नरवडे तसेच नगर येथील एलसीबी पथकाने दाखल होऊन तपसाचया दृष्टीने हालचाली सुरू केल्या

अहमदनगर लाईव्ह 24