अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यामध्ये राहुरी येथील रोहिणी राजेंद्र डावखर हीने या परिक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले.
रोहिणी डावखर या वसंतराव डावखर यांची नात तर झुआरी अॅग्रोचे जनरल मॅनेजर राजेंद्र डावखर यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.