रोहित पवार म्हणाले ‘अमृता ताई, अशीच आवड जोपासा…’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली गाण्याची आवड जोपासली आहे.

आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. कधी याच गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी कौतुक केले आहे. अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली.

नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे त्यांनी महिला दिनाच्या दिवशी शेअर केले आहे.

या गाण्याचा गीतकार डॉ. स्वप्ना असून गाण्याला चाल रोहन रोहनने दिली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,’काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो.

अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’ गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24