अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहेत. राज्याच्या काही शहरांमध्ये पेट्रोलने शतक गाठले आहे. इंधन दरवाढीविराेधात केंद्र सरकारविरोधात सर्वसामान्यांपासून विरोधकही आक्रमक झाले आहेत.
मात्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण, एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा, तरच इंधन दरवाढीत दिलासा असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला ट्वीट करून दिला आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पेट्रोल – डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार हा स्वागतार्ह आहे.
मात्र, एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून केंद्र एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा विचार करेल, अशी अपेक्षा, असे आमदार रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.