अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- लॉकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी #lockdown पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचंय,
लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाहीये,असं मला वाटतं’, असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
ट्वीटमधून रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला नसला तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्व घटक म्हणजे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची भावना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीच आता काटेकोरपणे नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणालेत.
तसंच लॉकडाऊन राज्यासह सर्वसामान्य जनतेलाही पूरक ठरणार नाही, असे आमदार पवार यांचे म्हणणे आहे. राज्यात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय.
राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे. हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे.
अन्यथा परिस्थिती जास्त भीषण होत जाईल. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे.