Royal Enfield Classic 350 Rivals : रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ला या 3 बाईक देतात टक्कर; इंजिन आहे जास्त पॉवरफुल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Royal Enfield Classic 350 Rivals : मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डच्या गाड्यांची इतर गाड्यांपेक्षा क्रेझ जरा वेगळीच आहे. रॉयल एनफिल्डने पूर्वीपासूनच मार्केटमध्ये दबदबा कायम ठेवला आहे. तर ग्राहकही या गाड्यांकडे आकर्षित होत असतात. मात्र या गाडीला टक्कर देण्यासाठी बाजारात आता अनेक गाड्या उपल्बध झाल्या आहेत.

Royal Enfield Classic 350 ला 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळते, जे 6,100rpm वर 20.2HP पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm आउटपुट जनरेट करते. यात 5 स्पीड ट्रान्समिशन मिळते. त्याची शक्ती Honda H’ness CB350, Benelli Imperiale 400 आणि Jawa 42 पेक्षा कमी आहे.

Honda H’ness CB350 मध्ये 348.36cc, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन आहे. Royal Enfield Classic 350 आणि त्याच्या इंजिनमध्ये CC मध्ये फारसा फरक नाही. हे 5500rpm वर 21.1hp पॉवर आणि 3000rpm वर 30Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड ट्रान्समिशन मिळते.

Benelli Imperiale 400 मध्ये 374cc, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन आहे. यात Royal Enfield Classic 350 पेक्षा मोठे इंजिन आहे. हे 6000rpm वर 21hp पॉवर आणि 3500rpm वर 29Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड ट्रान्समिशन देखील मिळते.

Jawa 42 मध्ये 293cc, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन आहे. Royal Enfield Classic 350 च्या तुलनेत, याचे इंजिन लहान आहे पण जास्त पॉवर देते. हे 27.3hp पॉवर आणि 27Nm टॉर्क आउटपुट तयार करते. तथापि, याला 6-स्पीड ट्रान्समिशन मिळते.