आरपीआय आठवले गट ‘या’ मागणीसाठी करणार नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील नवीन रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य पुरवठा मिळणे तसेच गरजूंना अर्थ सहाय्य योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन 28 सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आलाय.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील बहुजन समाजातील श्रमिक, कष्टकरी, असंघटित कामगार यांना राहुरी तहसील पुरवठा विभागामार्फत नवीन रेशन कार्ड सन 2019 पासून पुढील मिळालेल्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड मिळाल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला नाही.

तरी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वंचित घटकांना रेशन कार्डवर धान्य मिळावे. म्हणून इष्टांक वाढवून मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडून इष्टांक वाढवून द्यावा व तालुक्यातील सर्व गोरगरीब कष्टकरी जनतेला धान्याचा पुरवठा करावा.

गरजूंना अर्थसहाय्य योजना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना,

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनांसाठी अर्थ सहाय्य शासन महाराष्ट्रातील गरजू कुटुंबातील व्यक्तींना प्रशासनाच्या नियमावली नुसार गृह चौकशी करून त्यांच्या उपजीविकेसाठी अर्थ सहाय्य करत असते.

परंतु राहुरी तालुक्यातील संबंधित प्रशासकीय तलाठी सर्कल ते स्वतः व्यक्तीची योग्य चौकशी न करता गैरमार्गाने चौकशी करतात. त्यामुळे योग्य गरजूंना लाभ मिळत नाही. याबाबत आपण योग्य ती दखल घ्यावी. कोरोना महामारी मुळे यांनी या अर्थासह यासाठी अर्ज केलेले आहे.

त्यांना लाभ मिळालेले आहे. तसेच त्यांचे लाभ बंद झाले आहे. अशा पात्रताधारक लाभार्थ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावे. याबाबत योग्य निर्णय घेऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा.

अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मार्फत राहुरी बस स्टँड समोर 28 सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे, सुनील चांदणे, शहराध्यक्ष सचिन साळवे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे,

तालूका उपाध्यक्ष छाया दूशिंग, सचिन डहाणे, राॅबट सॅम्युअल, राजू दाभाडे, अरविंद दाभाडे, नवीन साळवे, गोविंद दिवे, माधव विधाते, दुर्गेश वाघ, पंछी शिरसाठ, मयूर सूर्यवंशी, तुषार दिवे, मच्छिंद्र जाधव, सागर उल्हारे आदि उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office