फसवणुक करणार्‍या त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची आरपीआयची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :-  सर्वसामान्य कुटुंबाला जास्तीची जागा दाखवून कमी जागेची खरेदीखत देणार्‍या व अधिक पैश्याची मागणी करणार्‍या शिवशक्ती कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, आरपीआय युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, शहराध्यक्ष नईम शेख, जावेद सय्यद, संतोष पाडळे,

दिनेश पाडळे आदिंसह तनपुरे कुटुंबीय उपस्थित होते. तनपुरे कुटुंबीयांनी शिवशक्ती कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक दत्तात्रय गावडे, महेश गावडे यांच्याशी रो हाऊसिंग घराचा व्यवहार केला होता. सर्व व्यवहार 14 लाख 50 हजार रुपयाला झाला.

व्यवहार करता वेळी सदर जागा 873 स्केअर फुट इतकी सांगण्यात आली. होती परंतु अस्तित्वात ती जागा 750 इतकी निघाली. खरेदी करतावेळी खरेदीखत वाचण्यासाठी मागितले असताना, वाचू न देता तशाच सह्या घेण्यात आल्या. घराच्या पैश्याचा पहिला हप्ता दीड लाख रुपयांचा चेक शिवशक्ती कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांना देण्यात आला

व त्याची रितसर पावती देखील मिळाली. मात्र दुसरा दीड लाखाचा हप्ता देताना शिवशक्ती कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या नावाने पावती देण्यात आली. राहिलेले पैसे तनपुरे यांनी एका बँकेतून कर्ज घेऊन बिल्डरला दिले. व्यवहारापोटी एक लाख इतकी रक्कम बाकी असल्याने

बिल्डरने तनपुरे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करुन धमकाविण्यास सुरुवात केली आहे. तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. तनपुरे कुटुंबीय जागा कमी असल्याचे सांगत असल्याने सांगितल्याने सदर बिल्डरने काही न ऐकता उर्वरीत पैसे न दिल्यास घर खाली करण्यासाठी सांगत असून, यामुळे तनपुरे कुटुंबीय भयभीत झाले आहे.

त्यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली असता एमआयडीसी पोलिस स्टेशनला संबंधित बिल्डर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तनपुरे यांचा व्यवहार एका बिल्डरकडून झाला तर खरेदी दुसर्‍याने दिली आहे.

जास्तीची जागा दाखवून कमी जागेची खरेदीखत देणार्‍या व अधिक पैश्याची मागणी करणार्‍या शिवशक्ती कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर पिडीत कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office