ह्या तालुक्यात कोरोनाचा रुद्रावतार ! दोन दिवसांत १०१ कोरोना रुग्ण वाढले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  संगमनेर शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाची धावपळ वाढली. गुरुवारी ५३, तर शुक्रवारी ४८ अशा १०१ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ६ हजार ७१७ झाली.

संगमनेरात बंद पडलेली कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.बाधितांची वाढती संख्या बघता संगमनेर पालिकेने कॉटेज रुग्णालयातील कोविड सेंटर गुरुवारपासून नागरिकांसाठी कार्यान्वित केले.

रुग्ण संख्या ७ हजाराजवळ येऊन ठेपल्याने नागरिकही आता धास्तावले. मुलांच्या शाळा सुरू असल्याने पालक वर्गात भीती आहे. शाळा बंद ठेवण्याची मागणी वाढली. शाळा सुरू ठेवणार असाल, तर विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्या, अशी चर्चा होत आहे.

काही नागरिक अद्यापही नियम पाळत नसल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने फक्त लॉन्सवर लक्ष केंद्रित न करता हॉटेलमधील गर्दी नियंत्रणात आणली पाहिजे.मंगल कार्यालय व लॉन्सवर कारवाई होत असल्याने विवाह समारंभ आता घरी, शेतात, धार्मिक स्थळी किंवा सामाजिक सभागृहात मोठ्या उपस्थितीत होत आहे.

येथे नियमांचे पालन होत नसल्याचे पुढे येत आहे. हा निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. नाशिक-पुणे महामार्ग व बायपासच्या हॉटेलात गर्दी वाढली. याचा परिणाम ग्रामीण भागात दिसतो आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24