ताज्या बातम्या

Rule Change March : 1 मार्चपासून बदलणार हे नियम ! सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Rule Change March : फेब्रुवारी 2024 हा महिना संपून उद्यापासून मार्च महिना सुरु होणार आहे. मार्च महिना सुरु होणार असला तरी या महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर किंवा रोजच्या जीवनशैलीवर परिणाम होणार आहे.

मार्च महिना सुरु होताच गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये देखील बदल होणार आहे. तसेच केवायसी, जीएसटी, एलपीजी सिलिंडर आणि बँकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅसच्या नवीन किमती जाहीर केल्या जातात. 1 मार्च 2024 म्हणजचे उद्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जाणार आहेत.

1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता 1 मार्चला देखील गॅसच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोशल मीडियाचे नवीन नियम

सरकारकडून उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून सोशल मीडियाच्या नियमांत देखील बदल केला जाणार आहे. सरकारकडून नवीन माहिती तंत्रज्ञान नियम लागू करण्यात आले आहेत.

सरकारकडून लागू करण्यात येणारे नवीन नियम फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना फॉलो करावे लागणार आहेत. जर कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.

फास्टॅग केवायसी नियम

कार चालकांसाठी देखील FasTag KYC करणे बंधनकारक केले आहे. 29 मार्च 2024 पर्यंत FasTag KYC करण्यास सांगितले आहे. जर FasTag KYC केले नाही तर तुमचे FasTag खाते काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.

जीएसटीशी संबंधित नवीन नियम लागू होणार

सरकारकडून कारचोरी रोखण्यासाठी अनेक नवीन नियम लागू केले जात आहेत. आता मार्च 2024 मध्ये देखील सरकारकडून करचोरी रोखण्यासाठी जीएसटीशी संबंधित नवीन नियम लागू केला जाणार आहे. ई-चलानसाठी ई-वे बिल तयार करण्याची गरज भासणार नाही.

मार्च महिन्यात बँकांना किती सुट्टी

मार्च महिन्यात बँकांना सर्वाधिक सुट्टी असल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहाराची अडचण निर्मण होण्याची शक्यता आहे. मार्च 2024 मध्ये बँकांना तब्बल 14 दिवस सुट्टी आहे. यामध्ये 8 सुट्या सणांसाठी आहे तर बाकीच्या शनिवार आणि रविवारच्या आहेत.

Ahmednagarlive24 Office