Rule Changes From August : कामाची बातमी! १ ऑगस्टपासून होणार गॅसच्या किमतीपासून हे मोठे बदल, पहा तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rule Changes From August : जुलै महिन्याचे अवघे काही दिवस उरले आहेत. लवकरच ऑगस्ट २०२३ हा महिना सुरु होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अनेक बदल देशात होत आहेत. तसेच ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला देखील देशात अनेक मोठे बदल होणार आहेत.

ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे येत्या पुढील महिन्यात तुमच्या खिशावर काय परिणाम होणार का? तसेच तुमचे बजेट बिघडणार का? कोणत्या नियमांत बदल होणार आहेत ते जाणून घेऊया…

३१ जुलै कर भरण्यासाठी शेवटची तारीख आहे. तुम्हीही करदाते असाल आणि तुम्ही आयटीआर दाखल केला नसेल, तर लवकरात लवकर इन्कम टॅक्स रिटर्न भरा. कारण ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही अशा करदात्यांना १ ऑगस्टपासून दंड भरावा लागणार आहे.

१ ऑगस्टपासून वाहतुकीच्या नियमांमध्ये देखील मोठा बदल होणार आहे. 1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच जर कोणी दारू पिऊन वाहन चालवल्यास त्याला ६ महिन्यांचा तुरुंगवास होणार आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. तुम्हालाही अशी गुंतवणूक करायची असेल तर हे काम वेळेआधी करा.

दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीमध्ये देखील बदल होत असतात. पुढील ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला देखील गॅसच्या किमती बदलू शकतात. सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.

तसेच जर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला बँकेसंबंधी काही काम असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना १४ दिवस सुट्टी असल्याने बँक देखील बांध राहणार आहेत. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे.

अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणारे लोक हैराण झाले आहेत. अॅक्सिस बँकेने 1 ऑगस्टपासून कॅशबॅक आणि इन्सेंटिव्ह पॉइंट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अक्सिक्स बँकेचे क्रेडिट कड वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ऑगस्ट महिन्यामध्ये या बँकेच्या धनादेशाशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला याबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.