अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे प्रशासन सर्वोच्च पातळीवर काम करत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात काही नागरिक शेतात जाऊन तळीरांम पार्ट्या करत आहेत.
अशा ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे उल्लंघन करून लॉकडाऊनची मजा लुटली जात आहे.
करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे आणि अशावेळी ग्रामीण भागातील नागरिक शेतात जाऊन पार्ट्या रंगवत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विशेष म्हणजे अशा पार्ट्यांसाठी बाहेरून खाद्यपदार्थ मागविले जात आहेत. अशी विशेष मागणी पूर्ण करण्यासाठी परिसरातील संबंधित विक्रेत्यांकडून दुप्पट,
तिप्पट दर लावून पाव, नॉनव्हेज, व्हेज, अवैध दारू यासह अन्य वस्तू पुरविल्या जात आहेत. दिवसा व रात्री उशीरा अशा पार्ट्या रंगत असल्याने करोना सारख्या महामारीत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतं आहे
शनिवार आणि रविवारी अशा पार्ट्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनचे नियम मोडून शेतीवर जाऊन पार्ट्या करणार्यांवर अंकुश कोण ठेवणार? अशी चर्चा परिसरात असून
अशा पार्ट्यांतून करोना बाधितांची संख्या वाढू शकते. ग्रामीण भागातील काही हौशी तळीराम अशा पार्ट्या करत असून ते स्वत:सह इतरांनाही करोनाच्या धोक्यात लोटत आहेत.