साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

असून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी मंगळवार दि. 23 रोजी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईसंस्थानकडून कोव्हिडची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी म्हणून रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरतीसाठी भाविकांना बंदी घातली आहे.

साईंची पहाटे होणारी काकड आरती तसेच रात्रीच्या शेजाआरतीस भाविकांना हजेरी लावता येणार नाही. दर गुरुवारी निघणारा पालखी सोहळा बंद करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24