अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2021 दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने देणे संबंधी पुढील प्रमाणे पध्दत अवलंबली जाणार आहेत. अर्ज विहित नमुना फॉर्म नं. ए.ई-5 मध्ये करणे, अर्ज ज्या त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयात उपलब्ध राहील.
विस्फोटक नियम 2008 मधील part 2 (See rules 100 and113) मधील A(13 a) (viii) प्रमाणे अर्ज छाननी फी रु. 300/- तेसच part 2 (See rules 100 and113) मधील B(l) iv (a) प्रमाणे परवाना फी रु. 500/- अशी एकूण रु. 800/- परवाना फॉर्म नं. एल.ई-5 साठी ॲडमिनीस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेस रिसीट अंडर एक्सल्पोझिव्ह ॲक्ट आदर कलेक्शन 0070 ओ.ए.एस. या शिर्षकाखाली संगण क्र. 0070008101 खालील स्टेट बँकेत चलनाने भरावी व चलनाची मुळ प्रत अर्जासोबत जोडुन पाठवावी.
परवाना फीचे चलन तहसिल कार्यालयातुन मंजुर करुन घेऊन तालुका ठिकाणचे स्टेट बँकेत भरता येतील. स्टॉल ग्रामपंचायत हद्दीत असेल ग्रामपंचायतीचा दाखला अथवा महानगरपालिका हद्दीत असल्यास महानगर पालिकेची शिफारस तसेच नगरपालिका हद्दीत असल्यास नगरपालिकेची शिफारस तसेच छावणी हद्दीत कार्यकारी अधिकारी छावणी मंडळ यांची शिफारस जोडावी.
नियोजीत जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असावी, नसल्यास समक्ष अधिका-यांची तात्पुरती उक्त प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी घेऊन सादर करावी. फटाका स्टॉल करिता तंबु उभारताना तो ज्वलनशील पदार्थापासुन बनविलेला नसावा.
तसेच तो बंदीस्त असावा आणि बेकायदेशीर व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही असा असावा. दोन स्टॉलमध्ये कमीत कमी तीन मिटर अंतर असावे, तसेच संरक्षित कार्यस्थळापासुन 50 मी. लांब असावे. सदरचे स्टॉल समोरासमोर असु नयेते. स्टॉल मध्ये गॅसबत्ती, दिवा, उघडे दिवे वापरु नये, विद्युत जोडणी लाकडी बोर्डव्दारे स्टॉलनिहाय असावी.
विद्युत जोडणी भिंतीवर अथवा छतावर पक्या स्वरुपात असावी. प्रत्येक रांगेकरीता स्वतंत्र मास्टर स्विच बसविण्यात यावे. फाटाका स्टॉल पासुन कोणालाही 50 मिटरचे आत फटाके उडविता येणार नाहीत. एका दुकान समुहामध्ये 50 पेक्षा जास्त दुकाने ठेवू नयेत. शोभेची दारु स्टॉलच्या खिडकीमध्ये प्रदर्शनास ठेवू नयेत.
तसेच विक्री कामी ठेवण्यात आलेली शोभेची दारु आगप्रतिरोधक वस्तु मध्ये ठेवण्यात यावी किंवा मुळ बाह्य आवरणासह विक्री कामी ठेवण्यात यावी. ज्वलनशिल पदार्थ व दुकानातील रहदारीच्या जागेपासुन योग्य अंतरावर ठेवावे. ज्यावेळेस मुळ आवणातुन शोभेची दारु विक्री कामी खोलली जाते ती शोभेची दारु तात्काळ स्वच्छ धुळ रहीत जागेत तसेच आगप्रतिरोधक पात्रामध्ये ठेवण्यात यावी.
\फटाके साठवण्यासाठी आणि विक्रीसाठी परवाना असलेले दुकान, अशा ज्वलनशील, विस्फोटक अथवा धोकादायक वस्तू साठवणूकीच्या परिसरापासून किमान पंधरा मीटर अंतरावर असावे. जनहित याचिका क्र. 152/2015 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार फटाके दुकान निवासी अथवा तळघरात असणार नाही.
फटाका विक्री दुकान भरवस्तीत असू नये. जिथे खुली जागा उपलब्ध आहे तेथे फटाका दूकान असावे. नमूद बाबीबात स्वयं घोषणापत्र सादर करावे . विस्फोटक नियम, 2008,नियम 84,85 व 86 मध्ये नमूद नियामानुसार. वरील प्रमाणे सर्व बाबींची पुर्तता करुनच दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पुर्वी ज्या त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावेत व परवाना तयार झालेनंतर तेथुनच परवाना घेऊन जावे.
सर्व संबंधीत तहसिल कार्यालयात वरील नमूद सर्व बाबींची पुर्तता पाहुनच परिपुर्ण प्रकरण जिल्हादंडाधिकारी कार्यालयात सादर करुन प्रकरण पुर्ण झाल्यानंतर अर्जदारास मुदतीत परवाना देण्याची जबाबदारी त्यांचेवर राहील.
अपुर्ण प्रकरण स्वीकारले जाणार नाही किंवा चुकुन प्राप्त झाल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच अर्जदार यांनी आपआपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत व तेथुनच घेऊन जावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.