शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून नियम : बाइक रॅली, मिरवणुकांना मनाई !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धुमधडाक्यात साजरा करता आला नाही.

यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा साधेपणाने साजरी करावी,

अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. शिवजयंती साजरी करण्यासंबंधीच्या गाइडलाइन्सच ठाकरे सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवजयंती साजरी करण्यासाठीच्या अटी व नियम :-

  • – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनामुळे यंदा साधेपणानं साजरी करावी.
  • गड – किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच हा उत्सव साजरा करावा.
  • सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
  • प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी; महारांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक असेल.
  • 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास मत्र परवानगी असेल. पण, तिथंही नियमांचं पालन बंधकारक असेल.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनानं या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसं आवाहन करावं.
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
  • © Copyright 2021, all rights reserved
अहमदनगर लाईव्ह 24