Russia Ukraine war : आता भारतीयही युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याचे बळी ठरत आहेत. आज युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुधवारी भारतासाठीही एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही खार्किवमध्ये गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
रशियन सैन्य युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. युद्धाच्या सातव्या दिवशी सकाळपासून रशियन सैनिक राजधानी कीववर हल्ले करत आहेत.
सकाळपासून सुरू असलेल्या गोळीबारात आतापर्यंत बरीच विध्वंस झाली आहे.बुधवारी सकाळपासून हे हल्ले सुरू आहेत. कीवमध्ये सरकारी इमारतींवर हल्ले होत आहेत.
नवीन एस जी, वय (21) असे पीडित तरुणाचे नाव असून तो हावेरी जिल्ह्यातील चालगेरी येथील रहिवासी आहे.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना “खार्किव आणि इतर संघर्ष क्षेत्रांमधील शहरांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी त्वरित सुरक्षित मार्गाच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये कर्नाटक राज्याच्या हावेरी जिल्ह्यातील चालगेरी येथील नवीन शेखरप्पा ग्यानगौदार नावाचा विद्यार्थी गोळी लागून ठार झाला.
घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीनचे वडील शेखर गौडा यांच्याशी बोलून नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला.
पहिली घटना ताजी असतानाच अजून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. चंदन जिंदाल वय (२२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
तो विनितसिया नॅशनल पायरोगोव्ह, मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी, विनितसिया युक्रेन येथे शिकत होता. जिंदालला इस्केमिक स्ट्रोक आल्याने इमर्जन्सी हॉस्पिटल विनितसिया (किवस्का स्ट्रीट 68) मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहिले आहे.