सचिन वाझेच्या अडचणी वाढल्या ; मीठी नदीत सापडला पुराव्यांचा ‘खजिना’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आता एनआयएच्या हाती नवीन पुरावे लागल्याने एकच खळबळ माजली आहे.

मनसुख हत्या प्रकरणामध्ये आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली.

त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेचा थेट संबंध असल्याचे बरेचसे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने रविवारी बीकेसी परिसरात मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली.यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य मिळालं.

यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली असून, दुसऱ्यांदा न्यायालयाने एनआयएकडे ताबा दिलेला आहे.

एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदी पात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या.

मिठी नदीमध्ये आढळून आलेल्या डीव्हीआरमध्ये कदाचित वाझे वास्तव्यास असलेल्या घराजवळील साकेत कॉम्प्लेक्स तसेच इतर ठिकाणचा सीसीटीवी फुटेज असेल त्यामुळे तो इथे नष्ट केला असण्याची दाट शक्यता एनआयएकडून व्यक्त केली जात आहे.

एवढ्या मोठा प्रमाणात पुरावे आढळून आल्याने आता सचिन वाझेच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ३ एप्रिलपर्यंत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्यांना आधी २५ मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यात ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एनआयएने सचिन वाझेला अटक केली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24