साईबाबा विश्वस्त मंडळ निवड : बाळासाहेब थोरात म्हणाले … त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  सामान्य साईभक्त कार्यकर्त्याला सेवेची संधी मिळावी यासाठी शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळ नियमात काही माफक बदल केले आहेत हे बदल फार मोठे नाहीत.

मात्र यामुळे ज्याच्याकडे या कामास देण्यासाठी वेळ आहे, अशा कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

दरम्यान संस्थांची संभाव्य म्हणून माध्यमात आलेली यादी म्हणजे कल्पनेपलीकडे काही नाही, असेही ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जे विश्वस्त मंडळ अद्याप जाहीर झाले नाही, त्यातील नावे आधीच कशी चर्चेत आली?

ज्याने यादी सोशल मीडियात व्हायरल केली, त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते. असा चिमटा त्यांनी काढला.

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा होणार आणि नावाबाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्ष चर्चेतून ठरविणार, असे ना.थोरात यांनी निक्षून सांगितले. काँग्रेसकडे या पदासाठी सक्षम नेते आहेत, असे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24