अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात स्वयंपाकी (आचारी) म्हणून काम करणार्या दिलीप बाबासाहेब सांबरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली.
निळवंडे शिवारातील बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतला. दिलीप सांभारे हे साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात आचारी म्हणून काम करीत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी वहीत लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली.
शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. निळवंडे शिवारातील ज्या बाभळीच्या झाडाला सांबरे यांनी गळफास लावून घेतला होता, तेथे ग्रामस्थांना त्यांची दुचाकी आढळून आली आपणावर ही वेळ आणण्यास जबाबदार पाच जणांची नावे मयत सांभारे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली असून 15 लाख रुपयांचा
आर्थिक व्यवहार त्यात नमूद आहे. याप्रकरणी हे. कॉ. विष्णू आहेर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वेणुनाथ सूर्यभान गोंदकर ( रा. शिर्डी ), अनिता दिलीप सांभारे (रा. शिर्डी ),
नानासाहेब श्रावण जाधव ( रा. शहा ), मंदा बाळाजी जाधव ( रा. शहा ) व भीमा बाळाजी जाधव ( रा शिर्डी ) तसेच व्याजाचे पैसे दिलेल्या तीन अज्ञात व्यक्ती असे आठजणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यातील एक आरोपी हा राजकीय व्यक्तीचा भाऊ आहे.