अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील भीमानदी काठी असलेल्या अजनुज येथील रहिवासी अमोल उर्फ विजय नामदेव गिरमकर (वय ३३) यांच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांच्याकडून १ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंधरा दिवसापूर्वी सकाळी घरासमोर पाण्याच्या हौदात विजेचा प्रवाह उतरल्याने तेजल संदीप गिरमकर यांना पाणी घेताना विजेचा धक्का बसला.
आपल्या भावजईला वाचविण्यासाठी अमोलने धाव घेतली. परंतु विजेचा जोराचा धक्का बसून अमोल पाण्याच्या हौदात पडला वीज प्रवाह बंद होईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच या गटाचे जिल्हा परिषद सदस्य स्व.सदाअण्णा पाचपुते यांचे चिरंजीव साजन सदाशिव पाचपुते
यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या मार्फत कै.अमोल गिरमकर याच्या पत्नी राणी अमोल गिरमकर व दीड वर्षाचा लहान मुलगा अथर्व यांच्या नावे एक लाखाची मुदत ठेव पावती करुन गिरमकर कुटुंबाला मदतीचा हात दिला.