कर्तव्यनिष्ठेला सलाम : गर्भवती असूनही डीएसपी महिला बजावतेय कर्तव्य!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत छत्तीसगडमध्ये हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात असताना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.

या कठिण काळात बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडा येथील पाच महिन्यांची गर्भवती असणाऱ्या डीएसपी शिल्पा साहू या हातात लाठी घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत.

भर उन्हात रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावणाऱ्या या डीएसपी शिल्पा साहू यांच्या धाडसीपणाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

डीएसपी शिल्पा यांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल व्हिडीओत त्या एका हातात लाठी घेऊन तोंडावर मास्क लावून रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत आहेत.

हा व्हिडीओ बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडा येथील आहे. महिला पोलिस अिधकारी लोकांना घरात थांबण्याचे, विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. शिल्पा शाहू यांनी नक्षलग्रस्त भागात चांगले काम केलेले आहे.

छत्तीसगडच्या अॅडिशन ट्रान्सपोर्ट कमिशनर दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर डीएसपीचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहीली आहे की हा फोटो दंतेवाडा डीएसपी शिल्पा साहू यांचा आहे.

गरोदर असतानाही भर उन्हात रस्त्यावर उभे राहून आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत आहे. लोकांना कोरोनाबाबत जनजागृती करत आहे. कोरोना संक्रमणाची दुसरी लाट धोकादायक आहे.

पोलिस आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. तुम्हीही जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडा, घरात सुरक्षित राहा असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24