अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- मराठा आरक्षण प्रश्नाबाबत खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता पुढच मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचं संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.
संभाजीराजेंनी जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेटी घेतल्यानंतर तर्कवितर्क लढवणाऱ्यांनाही आपल्या भाषणामधून चांगलाच टोला लगावला आहे.
तसेच या भाषणात बोलताना त्यांनी आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचं अधोरेखित केलं. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची असल्याचं संभाजीराजेंनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाहीय, असं सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल असं स्पष्ट केलं.
वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याया मिळून द्यायाचा आहे, असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितलं.