ताज्या बातम्या

संभाजीराजेंची भाजपच्या बैठकीत उपस्थिती, एखादे पद मिळणार?

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा नाकारल्याने शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीवर नाराज झालेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आज भाजपच्या बैठकीली उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना भाजपकडून एखादे पद दिले जाते काय? याची चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपील पाटील, खासदार संजयकाका पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबतच संभाजीराजे छत्रपती हेही उपस्थित आहेत.

उद्यापासून सुरू होणारे अधिवेशन, अध्यक्षपदाची निवडणूक, बहुमत चाचणी आणि नव्या सरकारपदील पदे वाटप यासंबंधी बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. भाजप नेत्यांसोबत तेथे संभाजीराजे उपस्थित असल्याने लक्ष वेधून घेतले आहे.

राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर आणि आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर संभाजीराजे यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पूर्वी त्यांना भाजपच्या कोट्यातूनच राज्यसभेवर घेण्यात आलेले होते. आता पुन्हा राज्यात भाजपच्या सहभागातील सरकार आले आहे, अशा परिस्थितीत संभाजीराजे यांना पुन्हा भाजपकडे गेल्याचे पाहून त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office