Samsung Galaxy M14 5G : स्मार्टफोनप्रेमींनो… बजेट ठेवा तयार! ‘या’ दिवशी लाँच होतोय सॅमसंगचा शक्तिशाली फोन, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy M14 5G : सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी सध्या आपल्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. कंपनी लवकरच भारतीय टेक बाजारात Samsung Galaxy M14 5G हा फोन लाँच करणार आहे.

कंपनीनं हा फोन मागील महिन्यात युक्रेनमध्ये लाँच केला होता. लवकरच हा भारतात लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन याच आठवड्यात म्हणजे 17 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. आगामी फोनमध्ये कंपनीने शक्तिशाली फीचर्स दिले आहेत.

पहा वैशिष्ट्ये

कंपनीच्या नवीन Samsung Galaxy M14 5G मध्ये 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले असून ज्याचा FHD+ रिझोल्यूशन 1080 x 2408 पिक्सेल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 13 वर आधारित One UI Core 5 वर काम करत आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.4GHz ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

याच्या स्टोरेजबद्दल विचार केला तर या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे, जे नंतर मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. तसेच या फोनची लांबी 166.8 मिमी, रुंदी 77.2 मिमी, जाडी 9.4 मिमी आणि वजन 206 ग्रॅम इतके आहे.

वापरकर्त्यांसाठी कंपनीने या फोनमध्ये एक अतिशय शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला असून यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा त्याच्या मागील बाजूस दिला आहे. तर या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत आहे.

किती आहे किंमत?

किमतीबद्दल विचार केला तर अजूनही कंपनीने या फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी याला जवळपास 18 ते 20 हजार रुपयांच्या किमतीत बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.