Samsung Galaxy S22 5G : तुम्ही आता Samsung चा सर्वात शक्तिशाली 5G स्मार्टफोन 30 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता, तुमच्यासाठी अशी ऑफर फ्लिपकार्टने आणली आहे. या सेलमधून तुम्ही Galaxy S22 5G हा फोन खरेदी करू शकता.
Galaxy S22 5G वर उपलब्ध असणारी ऑफर फ्लिपकार्टने स्पष्ट केली असून येत्या 8 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बिग बिलियन डेज सेलमध्ये अनेक सॅमसंग स्मार्टफोन्स खूप कमी किमतीत खरेदी करता येतील. मागील वर्षी सॅमसंगने आपला Galaxy S22 5G ला 86 हजार रुपये किमतीत लॉन्च केले होते, परंतु तुम्ही उपल्बध असणाऱ्या सर्व ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला तो 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
सवलतीत खरेदी करा Galaxy S22 5G
गेल्या वर्षी, Samsung ने Galaxy S22 5G हा शक्तिशाली फोन भारतीय बाजारपेठेत 85,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता. परंतु आता हा फोन Flipkart वर 54,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. तुम्ही बिग बिलियन डेज सेलमधून हा फोन बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनससह 39,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता.
अतिरिक्त विनिमय सवलतीचे मूल्य तुम्ही एक्सचेंज करत असणाऱ्या जुन्या स्मार्टफोनवर अवलंबून असणार आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीनुसार, 30,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. तुम्हाला याचा पुरेपूर लाभ घेता आला नसला तरीही, तुम्हाला तो Galaxy S22 5G कमी किमतीत खरेदी करता येईल. कंपनीचा हा फोन ग्रीन, बोरा पर्पल, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाइट कलर पर्यायांत उपलब्ध करून दिला आहे.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.1 इंच फुल एचडी 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह फ्लॅगशिप लेव्हल परफॉर्मन्स ऑफर करतो. या स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलवर 50MP 12MP 10MP प्रायमरी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.
तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये अनेक कॅमेरा फीचर्स आणि ३०x पर्यंत झूम क्षमता मिळेल. यामध्ये जलद चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 3700mAh बॅटरी देण्यात आली आहे.