Samsung Neo QLED Smart TV : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकताच सॅमसंगकडून मल्टी कलरसह निओ क्यूएलईडी 8के स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्यात आला आहे.
या नवीन सीरिजमध्ये 50 इंच आणि 90 इंच असे दोन स्मार्ट टीव्ही असणार आहेत. कंपनीने आपल्या नवीन सीरिजमध्ये तुम्हाला यात एज-टू-एज 8K चित्राचा आनंद घेता येणार आहे. तसेच कंपनीच्या या टीव्हीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
कंपनीने वायरलेस डॉल्बी अॅटमॉस आणि ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड प्रो टीव्हीसोबत उपलब्ध दिले आहेत. कंपनीच्या या टीव्हीमध्ये इनबिल्ट अलेक्सा उपलब्ध असणार आहे. तसेच या दोन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये लेटेस्ट 14 बिट प्रोसेसर दिला असून जो AI मध्ये विलीन झाला आहे. या टीव्हीमध्ये, आयओटीला ब्राइट हायलाइट्ससह समर्थन दिले गेले आहे, म्हणजे याचाच असा अर्थ की तुम्हाला या टीव्हीसह स्मार्ट होम डिव्हाइसेस नियंत्रित करता येईल.
किती आहे या टीव्हीची किंमत?
कंपनीचे हे Neo QLED 8K टीव्ही 98-इंच, 85-इंच, 75 आणि 65-इंच, 65-इंच मॉडेलमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत 3,14,990 रुपये इतकी आहे. Neo QLED 4K टीव्ही 65, 55 इंच, 50 इंच, 55 इंच मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत रु. 1,41,990 पासून सुरू होत असून जे ग्राहकांना हे टीव्ही 25 मे 2023 पर्यंत Neo QLED TV खरेदी करता येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना 99,990 रुपये किमतीचा HW-Q990 सॅमसंग साउंडबार आणि Neo QLED 4K टीव्हीसह 44,990 रुपयांचा मोफत HW-Q800 सॅमसंग साउंडबार मिळणार आहे. हे टीव्ही इन्फिनिटी स्क्रीन आणि इन्फिनिटी वन डिझाइनसह येत असून वापरकर्ते आता एज-टू-एज 8K चित्रासह तो चित्रपट, शो किंवा गेम पाहू शकतात.