ताज्या बातम्या

Samsung Offer : आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर! ‘या’ महागड्या 5G फोनवर मिळत आहे 41 हजार रुपयांपर्यंतची सवलत

Samsung Offer : सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर सतत हजारो रुपयांची सवलत मिळत असते. आता अशीच ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या सवलतीत तुम्ही आता Samsung Galaxy S21 FE 5G हा फोन आतापर्यंतच्या मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.

या फोनची मूळ किंमत 74,999 रुपये इतकी आहे. परंतु यावर सवलत मिळत असल्याने तुम्ही हा फोन 34,999 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की ही किंमत फोनच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची असून फोनच्या 256 जीबी वेरिएंटवर कंपनी 41 हजार रुपयांची सवलत देत आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टोरेजचा विचार केला तर सॅमसंगचा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Exynos 2100 चिपसेट देत असून या फोनमध्ये तुम्हाला 6.4 इंच फुल एचडी + डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला जात आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येत आहे. तसेच डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनीकडून यात गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात येत आहे.

कंपनीच्या या फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळत आहे. तर यामध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल आणि 12-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश असणार आहे. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येत आहे.

इतकेच नाही तर या फोनमध्ये 4500mAh बॅटरी मिळत आहे आणि ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात तुम्हाला 15W वायरलेस चार्जिंग मिळत आहे. तसेच हा फोन रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करत आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीकडून वापरकर्त्यांना या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय दिले जात आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts