Samsung Smartphone Offer : पहिल्यांदाच सॅमसंगच्या फोल्डेबल फोनवर मिळतेय सर्वात मोठी ऑफर, वाचतील हजारो रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Smartphone Offer : बाजारात सॅमसंगच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. त्यामुळं कंपनीही आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने काही दिवसापूर्वी आपला Galaxy Z Flip 4 हा फोल्डेबल फोन लाँच केला होता. जो तुम्ही आता खूप मोठ्या सवलतीत घरी आणू शकता.

किमतीचा विचार केला तर या फोनची मूळ किंमत 1,01,999 रुपये इतकी आहे. आता तो तुम्ही 89,999 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. या फोनवर कंपनी एकूण 8500 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत ​​असून तुम्हाला बँक ऑफरमध्ये त्याची किंमत 7 हजार रुपयांनी कमी करता येईल. जर तुम्ही हा फोन एक्स्चेंज ऑफरमध्ये खरेदी केला तर तुम्हाला 31,900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Samsung च्या Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनचा मुख्य डिस्प्ले 6.7 इंच असून जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले फुल एचडी रिझोल्यूशनसह डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्लेसह येतो. या कंपनीच्या फ्लिप फोनमध्ये, तुम्हाला 1.9 इंच दुय्यम AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल, जो 260×512 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करत असून स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तसेच ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हे दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सल्सचे असून फोनमध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

यात तुम्हाला 3700mAh बॅटरी पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 34 तासांपर्यंत 4G टॉकटाइम देते. तर कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax 2.4G 5GHz, USB 2.0, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type C earjack सारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन ग्रेफाइट, बोरा पर्पल आणि पिंक गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांत तुम्हाला खरेदी करता येईल.