Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung Smartphone Offer : मस्तच..! सॅमसंगच्या नवीन 5G फोनवर 28,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर

सॅमसंगच्या पुन्हा एकदा 5G स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी हा फोन मार्केटमध्ये लाँच केला होता.

Samsung Smartphone Offer : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगच्या सतत नवनवीन फोनवर सवलत मिळत असते. अशातच आता या कंपनीच्या 5G स्मार्टफोनवर सवलत उपलब्ध आहे. कंपनीचा Samsung Galaxy A34 5G हा फोन आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे तुमचे 28 हजार रुपये वाचू शकतील. या फोनची मूळ किंमत 35,499 रुपये इतकी आहे. यावर एक्सचेंज आणि बँक ऑफर मिळत असल्याने तुम्ही तो आता खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर Amazon च्या या डीलमध्ये मिळत आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. तर कंपनी डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देत आहे. सॅमसंगचा हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येत आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीने यात Octa-core MediaTek Dimensity 1080 चिपसेट उपलब्ध करून दिला आहे.

तर फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले असून यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स यांचा समावेश असणार आहे. सेल्फीसाठी कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी या फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळू शकेल. जी बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत आहे. याच्या OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 13 वर आधारित OneUI 5.1 वर काम करतो. सॅमसंग आपल्या नवीन फोनमध्ये पॉवरफुल ऑडिओसाठी डॉल्बी एटमॉस देत आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही लाइम, ग्रेफाइट आणि सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.