Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung Smartphone Offer : उरले फक्त काही तास! सॅमसंगच्या ‘या’ महागड्या फोनवर मिळत आहे 47,000 रुपयांची सवलत, पहा ऑफर

Samsung Smartphone Offer : सॅमसंग या स्मार्टफोन निर्माता कंपनीने मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच कंपनीने Samsung Galaxy S22 Plus 5G हा फोन काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. याच महागड्या फोनवर 47,000 रुपयांची सवलत मिळत आहे. परंतु ही ऑफर फक्त काही तासांसाठी उपलब्ध आहे.

कंपनीने मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Galaxy S22 Plus 5G हा स्मार्टफोन आणला होता. हा फ्लॅगशिप लाइनअपचा भाग असून आता तो तुम्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. अशी संधी Flipkart द्वारे देण्यात येत आहे. या फोनवर मोठ्या फ्लॅट डिस्काउंटशिवाय बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभही तुम्हाला घेता येणार आहे. या ऑफर्समुळे सॅमसंगचा शानदार फोन कमी किमतीत खरेदी करू शकता.

मिळणार मोठी सवलत

जर किमतीचा विचार केला तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलसाठी किंमत भारतीय बाजारात मागील वर्षी 1,01,999 रुपये इतकी होती. नवीन फ्लॅगशिप सीरिजच्या आगमनानंतर, याच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.

फ्लिपकार्टवर हा फोन 47,000 रुपयांच्या सवलतीनंतर 54,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. जर तुम्ही या फोनसाठी सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पैसे भरले तर, 10% कॅशबॅकचा लाभ स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे.

समजा ग्राहकांनी इंडसइंड बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने ईएमआय पेमेंट केल्यास त्यांना 10% अतिरिक्त सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केले तर 5% कॅशबॅक देण्यात येत आहे.

इतकेच नाही तर यावर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येत आहे. तर जुन्या फोनची देवाणघेवाण करणाऱ्यांना जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीनुसार 30,000 रुपयांपर्यंत कमाल एक्स्चेंज डिस्काउंट मिळेल. हा फोन ग्रीन आणि फँटम ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स…

कंपनीच्या शक्तिशाली स्मार्टफोनमध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.6-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर दिला आहे. Android 12 वर आधारित OneUI स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स उपलब्ध आहे, जी Android 13 वर अपग्रेड करता येईल.

याच्या मागील पॅनलवर 50MP मुख्य, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 10MP टेलिफोटो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून 10MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनची 4500mAh क्षमतेची बॅटरी 45W वायर्ड तसेच 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात 4.5W रिव्हर्स चार्जिंग फीचर देण्यात आले आहे.