Samsung Galaxy M04 : सॅमसंग सध्या जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे भारतीय बाजारात या स्मार्टफोनला मागणी आहे.
सॅमसंग लवकरच Samsung Galaxy M04 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. आगामी स्मार्टफोन 10,000 रुपयांहून कमी किमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
शक्तिशाली बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये 5,000mAH शक्तिशाली बॅटरी दिली आहे. फोनमध्ये MediaTek चा एंट्री लेव्हल Helio G35 चिपसेट आहे. रिपोर्टनुसार, फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. तर हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. हा Samsung galaxy A04e ची नवीन आवृत्ती आहे. हँडसेटचा फिंगरप्रिंट स्कॅनर फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटणाच्या वर ठेवला जाऊ शकतो.
कलर ऑप्शन
या स्मार्टफोनमध्ये 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशन डिस्प्लेसह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले असून HD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या समोर वॉटर ड्रॉप नॉच देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे.
जर आपण फोनच्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 13MP प्राइमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळू शकतो. भारतात हा स्मार्टफोन ब्लॅक, ऑरेंज, कॉपर आणि लाईट ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.