अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- अनेक दिवस वाळू तस्करी व गौण खनिज तस्करी करण्यात येणाऱ्या वाहनांची जप्ती केली आहे. मात्र अद्यापही त्यांनी शासनाचा दंड भरलेला नाही, त्यामुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी धडक कारवाई करीत, संबंधित थकित वाळू तस्कर यांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहीम उघडली आहे.
यात गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान तहसीलदार देवरे यांच्या आक्रमक व धडक कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत आहे. दरम्यान तालुक्यातील विविध नदीपात्र तसेच ओढ्या नाल्यांमधून वाळू तसेच तत्सम गौण खनिजाचे उत्खनन करणारी यांत्रिक उपकरणे, त्यांची वाहतूक करणारी वाहने महसूल विभागाने जप्त केलेले आहेत.
या उपकरणांसह वाहनांचा १० फेब्रुवारी रोजी लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. लिलाव करण्यात येणाऱ्यामध्ये २ पोकलेन, २ जेसीबी, १ ट्रॅक्टर, १ डंपर तसेच इंजिनसह असलेल्या पाच बोटी महसूल विभागाने जप्त केल्या होत्या.
यांत्रिक उपकरणे, वाहने तसेच बोटींवर दांडात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु दंडाची रक्कम जमा करण्यात न आल्याने त्याची विक्री करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.