संगमनेर तालुक्याची वाटचाल लॉकडाऊनकडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर,

राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

यातच संगमनेर तालुक्याची दिवसेंदिवस वाढणारी करोनाची संख्या लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून येत आहे.

संगमनेर तालुक्यात ६५६ रुग्ण सध्या उपचार घेत असून १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातून २७ जण तर ग्रामीण भागातून ४१ असे एकूण ६८ करोनाबाधित आढळून आले आहेत.

दरम्यान सर्व नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाशी मुकाबला करण्यासाठी नियमाचे पालन करावे.

सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच मास्कचा वापर कायम करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24