अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- पंढरपुर येथील कपलिनी संगीत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन जागतिक पातळीवरील शास्त्रीय गायन वादन स्पर्धेत नगरच्या संगीत बहार गुरुकुल विहारातील साधकांनी सहभागी होऊन बासरी वादन स्पर्धेत यश मिळविले.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. लहान गटात प्रणव दंडवते याने द्वितीय क्रमांक तर शिवराज भोर याने तृतीय व खुल्या गटात योगेश तिवारी याने प्रथम क्रमांक तर आशिष गवळी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
रोख रक्कम व प्रमाणात्र असे बक्षिसाचे स्वरुप आहे. जागतिक पातळीवर झालेल्या या स्पर्धेत देश-विदेशातून अनेक कलाकार सहभागी झाले होते. ही स्पर्धा 1 ते 20 जून 2021 दरम्यान झाली. त्याचा अंतिम निकाल जागतिक संगीत दिनानिमित्त 21 जून रोजी जाहीर झाला.
चि.प्रणव दंडवते, शिवराज भोर, योगेश तिवारी आशिष गवळी हे चारही जण प्रख्यात बासरी वादक जितेंद्र रोकडे यांचे शिष्य आहेत. तसेच आई-वडिल यांचेही मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी जितेंद्र रोकडे म्हणाले, गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण दिले जाते.
त्याचप्रमाणे दिग्गज कलाकारांकडून मार्गदर्शनही मिळते. त्यामुळे अनेक स्पर्धांत मध्ये गुरुकुलचे विद्यार्थी राष्ट्रीय व राज्य पातळीवर यश मिळत आहेत.
आतातर जागतिक पातळीवर मिळविलेल्या या यशाने राज्यासह अहमदनगरचे नाव चमकावले आहे. ही परंपरा अशी सुरु राहील असल्याचे त्यांनी सांगितले.