आटपाडी तालुक्याच्या प्रणवला दहावीत मिळाले 48.20% गुण; तरी देखील गावाने फ्लेक्स लावून केले हार्दिक अभिनंदन! काय आहे यामागील शेती कनेक्शन?

Published by
Ajay Patil

सध्या दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले व या दोनही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिनंदनपर असलेले अनेक स्टेटस किंवा फ्लेक्स देखील आपण प्रामुख्याने पाहिले असतील. साधारणपणे अशा परीक्षांमध्ये जे मेरिटमध्ये येतात किंवा ज्यांना डिस्टिंक्शनच्या पुढे मार्क मिळतात अशा विद्यार्थी विद्यार्थिनींचे लावले जातात. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला अगदी कमीत कमी गुण मिळाले तरी संपूर्ण गावांमध्ये त्याचे फ्लेक्स लागले व अभिनंदनाचा वर्षाव झाला तर आपल्या मनात बरेच विचार येतील.

त्यातल्या त्यात एखाद्या विद्यार्थ्याला दहावीला 48 टक्के मार्क मिळाले व इतके कमी मार्क्स मिळवून देखील अख्या गावाने त्याचे फ्लॅक्स लावून अभिनंदन केले तर नेमके काय विचार आपल्या मनात येतील याबद्दल आपण काही सांगू शकत नाही.

परंतु आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी या गावातील प्रणव सूर्यवंशी या मुलाला देखील दहावीमध्ये 48.20% इतके गुण मिळाले. परंतु तरीदेखील त्याच्या गावातील लोकांनी त्याचे फ्लेक्स लावून अभिनंदनचा वर्षाव केला.

आता तुम्ही म्हणाल की नेमके यामागील कारण काय असेल किंवा एवढे कमी मार्क मिळाल्यावर देखील गावातील लोकांनी का फ्लेक्स लावले असतील? सर्वांच्या मागील प्रमुख कारण आहे प्रणवला  असलेला डाळिंब शेतीचा नाद व त्या माध्यमातून त्यांनी मिळवलेले एक कोटी वीस लाखाचे उत्पन्न व तरी देखील अभ्यास करून मिळवलेले 48 टक्के मार्क्स याला खूप महत्त्व आहे.

 प्रणवणे डाळिंब शेतीतून मिळवले एक कोटी वीस लाखांचे उत्पन्न

आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी गावातील प्रणव सूर्यवंशी याने दहावी मध्ये 48.20% मार्क मिळवले व अख्या गावाने त्याचे फ्लेक्स लावून हार्दिक अभिनंदन केले. प्रणव हा पहिल्यापासून शाळेत व अभ्यासात कमी आहे परंतु शेतीमध्ये खूप प्रगत असा विद्यार्थी आहे.

त्याला फार कमी वयामध्ये डाळिंब शेतीचा नाद लागला व त्याने दहा एकरावरील डाळिंब शेती पूर्णपणे सांभाळली आहे. मागच्या वर्षी प्रणवणे डाळिंबातून एक कोटी 20 लाखांचे उत्पन्न मिळवले होते. या सगळ्या शेतीच्या नियोजनांमध्ये प्रणवणे दहावीत 48.20 टक्के का होईना मार्क मिळवले व उत्तीर्ण झाला.

त्यामुळे गावात प्रणवणे काठावर का होईना दहावीत यश मिळवले व त्यामुळे गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदनपर फ्लेक्स लावले. शाळेमध्ये एक दिवस देखील न जाता शेतीकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्याने 48.20% मार्क घेऊन उत्तीर्ण होण्याची किमया साधली. प्रणवला शेतीची अभ्यासापेक्षा प्रचंड आवड आहे व तो या वयात देखील डाळिंब शेतीची सर्व कामे आवडीने पूर्ण करतो.

जर आपण खानजोडवाडी या गावाचा विचार केला तर याला डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याने थोडी का असेना या ठिकाणी डाळिंब लागवड केलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे प्रणवला देखील डाळिंब शेतीचे प्रचंड असे वेड आहे व तो स्वतः दहा एकरावरचे डाळिंब बाग एकटा सांभाळतो.

यामध्ये औषध फवारणी असो किंवा इतर कामे तो स्वतः करतो. दहावीत असताना देखील त्याने शाळेकडे लक्ष न देता डाळिंब शेतीकडे पुरेपूर लक्ष दिले. तरीदेखील अभ्यास व शेतीची कामे यामध्ये चांगला समन्वय साधून त्याने दहावीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास केली. त्यामुळे सर्व गावाला याचा आनंद झाला व फ्लेक्स लावून त्याचा आदर सत्कार करण्यात आला.

प्रणव हा अभ्यासामध्ये जरी हुशार नसला तरी देखील त्याने सोळाव्या वर्षी शेतीच्या माध्यमातून मिळवलेले व्यवहार ज्ञान आणि शेतीमध्ये आलेली समज ही खूप महत्त्वाची आहे. शेतीमध्ये तो आजच पारंगत झाला आहे. या वयामध्ये डाळिंब शेतीतून एक कोटीच्या पुढे उत्पन्न मिळवणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही व त्यासोबतच शिक्षणात देखील 48 गुण मिळवून दहावी उत्तीर्ण करणे ही बाब देखील कौतुक करावी तेवढी कमीच आहे.

Ajay Patil