संजय राऊतांना काही कामधंदा नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे नसल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 12 सदस्यांची शिफारस विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी केली. यावर मुंबई हायकोर्टाने राज्यपालांना जाब विचारला आहे. ही 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली ‘यादी’ असलेली फाईल राज्यपाल सचिवालयातून अदृश्य झाल्याचे समोर आलं आहे.

हा तर धक्कादायक वगैरे प्रकार नसून सरळ भुताटकीचाच प्रकार आहे. फार तर त्यास गूढ गौप्यस्फोट म्हणता येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर फडणवीसांनी राऊतांवर टीका केली आहे.

राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली वक्तव्य आहेत.

हा निव्वळ पोरखेळ आहे, असा पोरखेळ कुणीही करू नये. संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं म्हणत फडणवसांनी राऊत यांना टोला हाणला आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24