Maharashtra : संजय राऊत यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता ! छगन भुजबळांच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत. संजय राऊत यांच्यावर कर्नाटकमध्ये हल्ला होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी समन्स बजावले आहे. त्यामुळे संजय राऊत हे कर्नाटकमध्ये जाणार आहेत. त्याचवेळी माझावर हल्ला होऊ शकतो असे मत संजय राऊत यांनीही व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत कर्नाटक न्यायालयात जाणार आहे, त्यामध्ये संजय राऊत यांनी स्वतः माझ्यावर हल्ला होऊ शकतो असे सांगितले आहे, त्यामुळे राजकारण न करता अमित शाह यांनी याबाबत लक्ष घातले पाहिजे असे राऊत म्हणाले आहे.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रा सीमा प्रश्न हा वाद सुरू आहे. बेळगाव हे महाराष्ट्रात यायला हवे होते, जगातले सगळ्यात मोठे आंदोलन इतक्या वर्ष चालले असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांच्या वर हल्ला चढविण्यासाठी बोलावले जाते ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जात आहे असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरही भुजबळांनी भाष्य केले आहे. सगळ्या पक्षानी एकत्र येऊन लढायला हवे, आम्ही जास्त लोकशाही वादी आहोत म्हणून ते इकडे येऊन झेंडे लावत आहे. चंद्रकांत पाटील,शंभू राज बेळगाव जाताय आणि त्यांचे लोक दिल्लीत कोर्टात जात आहे.

Advertisement

आपण दिल्लीत कोर्टात जायला हवे, नाहीतर पुन्हा महाजन कमिशन सारखे व्हायचे, सरकार कमी पडत आहे अस नाही असेही मत भुजबळांनी व्यक्त केले आहे.