संजय राऊत म्हणाले त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- आघाडीचे सरकार किती उत्तम कार्य करू शकते, याचा आदर्श महाराष्ट्राने घडवला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने आता भाजपशी जुळवून घ्यावे असे जे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे, त्यावरून राज्यात मोठेच राजकीय वावटळ निर्माण झाले आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन करून हे वावटळ शमवण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत म्हणाले की, तिन्ही पक्षांचे एकमेकांशी असलेले संबंध अत्यंत मजबूत आहेत. आघाडीत काम करताना हे तिन्ही पक्ष आपापली पक्ष संघटनाही मजबूत करीत आहेत.

राज्यातील आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या यावर अजून कोणताच निर्णय झालेला नाही. तो योग्य वेळी होईल. पण हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालवण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी व्यक्‍त केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

किमान समान कार्यक्रम हा या सरकारचा आत्मा असून, त्या आधारावर या सरकारची उत्तम वाटचाल सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24