ताज्या बातम्या

शहरातुन मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोर पोलीसांकडुन 48 तासामध्ये जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातुन मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोर हा तोफखाना पोलीसांकडुन 48 तासामध्ये जेरबंद करण्यात आला. या चोरट्याकडून गुन्हयातील चोरलेली मोटार सायकल केली हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याने सावेडीतील कोटक महींद्रा बँकेसमोर येथुन मोटार सायकलची चोरी करुन चोरुन नेल्याने फिर्यादी यांचे सांगणेवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे .

तोफखाना पोलीस दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाळी की सदर गुन्ह्यातील आरोपी निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे असल्याची माहीती मिळाली.

पोलिसांनी सदर भागात सापळा लावून त्यांना शिताफीने पकडुन गुन्ह्या संदर्भात अधिक माहीती घेतली असता त्याने पहीले टाळाटाळ केली. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे .

सदरचा गुन्हा हा आरोपी नामे प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे (वय -26 धंदा- फिटर गॅरेज रा. निघोज ता.पारनेर) असे आहे. आरोपीकडून अशा प्रकारच्या अजुन काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे .

Ahmednagarlive24 Office