सर्वाधिक विषारी सर्प कोब्राला पकडण्यात सर्पमित्राला आले यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे राहणारे दैवत ग्रामीण सह. पतसंस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे यांच्या घरासमोर निघालेल्या 5 फुटी कोब्रा नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश आले.

दरम्यान शिंदे यांनी तात्काळ संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले. मोरे यांनी ताबडतोब श्रीरामपूर येथील सर्पमित्र अमोल राळेगणकर व राहुरीचे सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले.

हे दोघेही सर्पमित्र अर्ध्या तासात टाकळीमिया येथे आले. सर्पमित्र यांनी मोठ्या शिताफीने या नागास बाहेर काढून बरणीत बंदिस्त केले.

त्यांनी सांगितले, हा अत्यंत विषारी कोब्रा जातीचा नाग आहे. या नागास जंगलात सोडणार असल्याचे सर्पमित्र पोपळघट यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24